*मिरा भाईंदर म्हणनगरपालिकेला कर वसूली मध्ये महाराष्ट्र राज्याचा दृतिय पुरस्कार

89 प्रतिशत केली वसूली


भाईंदर :-
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास दिनानिमित्त मिरा भाईंदर महानगरपालिका मालमत्ता कर विभागाने विक्रमी 89% कर वसुली केल्याने एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते महापालिकेस द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार 20 एप्रिल 2023 रोजी प्रदान करण्यात आला. कर विभागाने विक्रमी 89% कर वसुली केल्याने व उत्पन्न वाढीबरोबरच आस्थापना खर्चात बचत केल्या कारणाने है पुरस्कार देण्यात आला आहे . महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारला. सदर प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे व उपायुक्त रवि पवार उपस्थित होते.

दिनांक 31 मार्च 2023 रोजी मध्यरात्रीपर्यंत मिरा भाईंदर महानगरपालिका मालमत्ता कर विभागामार्फत ₹182 कोटीची विक्रमी कर वसुली करण्यात आला. ₹182 कोटी (89%) मालमत्ता कर वसुली करण्याचे श्रेय आयुक्त तथा प्रशासक  दिलीप ढोले यांनी अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (कर विभाग) संजय शिंदे, नियंत्रण अधिकारी, सहाय्यक नियंत्रण अधिकारी, मालमत्ता कर विभागप्रमुख, सर्व कर निरीक्षक, कर वसुली लिपिक व कर्मचारी यांना दिले आहे. त्याचबरोबर निर्देशानुसार कर वसुली करण्यासाठी नेमण्यात आलेल्या नियंत्रण अधिकारी व सहाय्यक नियंत्रण अधिकारी यांचे मा. आयुक्त यांनी विशेष कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले.  मागील वर्षीच्या तुलनेत यंदाची मालमत्ता कर वसुली ही उत्कृष्टरित्या व वेगाने करण्यात आली. मा. आयुक्त यांच्या निर्देशानुसार, उपायुक्त (माहिती तंत्रज्ञान) यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती व तंत्रज्ञान अधिकारी राज घरत यांच्या विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या www.mbmc.gov.in वेबसाईट व MyMBMC मोबाईल ॲपचा वापर करून मालमत्ता कर भरणा करण्यासाठी नागरिकांना आव्हान करण्यात आले होते. सदर आव्हानाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ऑनलाईन पद्धतीवर विशेष भर देत 1 लाख 25 हजार 697 नागरिकांनी एकूण 66 कोटी 27 लाख 03 हजार 419 इतका कर भरणा केला आहे. तर रोख रक्कमद्वारे 92 हजार 898 नागरिकांनी कर भरणा करून 37 कोटी 68 लाख 37 हजार 465 व धनादेशद्वारे (चेक) 91 हजार 560 नागरिकांनी कर भरणा करून एकूण 75 कोटी 21 लाख 27 हजार 625 इतका मालमत्ता कर भरणा केलेला आहे. मिरा भाईंदर महानगरपालिका कोषाग्रहामध्ये एकूण मालमत्ता कर 181 कोटी 52 लाख 92 हजार 260 इतका जमा करण्यात आला आहे. 

सर्व अधिकारी/कर्मचारी यांचे कर वसुलीसाठी केलेल्या प्रयत्नाने हा पुरस्कार प्राप्त झाले असल्याचे आयुक्त यांनी सांगितले व सर्वांचे अभिनंदन आयुक्त यांनी केले.खासदार, माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी सदस्य पत्रकार बंधू यांच्या सहकार्याने व शहरातील सर्व नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा करून केलेल्या सहकार्याबद्दल महापालिकेच्या व आयुक्त तथा प्रशासक  दिलीप ढोले यांच्या वतीने सर्वांचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

श्रमण संघीय साधु साध्वियों की चातुर्मास सूची वर्ष 2024

पर्युषण महापर्व के प्रथम पांच कर्तव्य।

तपोवन विद्यालय की हिमांशी दुग्गर प्रथम