ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक शुक्रवारी आरोग्य तपासणी

युथ फोरम आणि  ब्लेस्ड  फॉर एवर चा कार्यक्रम 

भाईंदर: - ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना निरोगी ठेवण्यासाठी मोबाइल हेल्थ केअर युनिटचे काम सुरू झाले ही खूपच चांगली बाब आहे.

उपरोक्त मत पद्मश्री ब्रह्मदेव पंडित यांनी सामाजिक सांस्कृतिक संस्था युथ सोशियल वेलफेयर एसोसिएशन (युथ फोरम),ब्लेस्ड  फॉर एवर, वीफॉरयू इत्यादी संस्थांनी सुरू केलेल्या शिबिराचे उद्घाटन करताना दिले. प्रमुख पाहुणे रमेश बंबोरी  होते. विशेष पाहुणे भायंदर मेडिकल होलसेल एसोसिएशन चे चिटनीस  भवानीशंकर गाडोदिया होते.भाईंदर  (पश्चिम) येथे सकाळी ९. ३० ते संध्याकाळी पांच पर्यंत मध्ये  शिव  ब्रह्म मंदिर (9.30 to 10.30am),भाईंदर पोलिस स्टेशन (10.45 to 11.45am), जैन मंदिर रोड (12.00 to 1pm), मोदी पटेल रोड (1.30pm), जय अंबे नगर (2.45pm),विरुंगळा केंद्र (3.30 to 5.00pm) अश्या सहा ठिकाणी हेलपेज इंडियाच्या मोबाइल हेल्थ केयर युनिट कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती फोरमचे उपाध्यक्ष अतुल एल गोयल यांनी दिली. कार्यक्रमाचे संयोजक सुंदर कोनार, कमलेश शहा आणि राहुल यादव आहे.या प्रसंगी हेलपेज इंडियाचे व्यवस्थापक चंद्रकांत ढोले यांनी पूर्ण सहकार करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमात प्रमोद तिवारी, रवी टुन्ना,राकेश अग्रवाल आदी  उपस्थित होते.फोरमचे अध्यक्ष दीपक आर जैन यांनी सांगितले लवकरच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्डे सुरू केला जाणार आहेत.या शिबिराला उज्ज्वल भारत न्यूज, छत्रपती जयकारा, सूरज प्रकाश, गणेश केटरिंग सर्व्हिस, खुशी डेंटल केअर यांचे सहकार्य आहे. 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

श्रमण संघीय साधु साध्वियों की चातुर्मास सूची वर्ष 2024

पर्युषण महापर्व के प्रथम पांच कर्तव्य।

तपोवन विद्यालय की हिमांशी दुग्गर प्रथम