आयोध्येतील राममंदिर सोहळ्यासाठी पुण्याहून युवकांची सायकल रॅली

श्री रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापणा व दर्शनाला दहा युवकांचा सायकलने प्रवास 


 पुणे -(अनिल भाई सोमय्या इरा प्रतिनिधी यांचे कडून ) : श्रीराम जन्मभूमी आयोध्यामध्ये श्री प्रभू रामचंद्राचे भव्य मंदिर व्हावे व मंदिरामध्ये श्रीरामप्रभूची मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा व्हावी ही हजारो वर्षांपासून असलेली संपूर्ण जगामधील हिंदू धर्मीयांची इच्छा आज दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी पूर्ण झाली आहे. या निमित्ताने देशातच नव्हे तर संपूर्ण जगामधील राम भक्तांमध्ये आनंदाचे उधाण आलेले आहे .

राम मंदिरात श्री राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा व्हावी यासाठी गेली पाच दशकापासून हिंदू धर्मीयांचा संघर्ष सुरू होता ,७६ वेळा लढे उभारण्यात आले ,असंख्य कारसेवकांनी आपले जीवाचे बलिदान दिले ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आयोध्येतील श्रीरामाच्या मंदिराचा प्रश्न मार्गी लागून भव्य असे श्रीराम मंदिर उभे राहिले आहे. लालकृष्ण अडवाणी यांचीही मनोकामना पूर्ण झाली आहे.

या जगातील भव्य दिव्य असलेल्या राम मंदिरात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना 22 जानेवारी 2024 रोजी अविस्मरणीय अशा सोहळ्याने झाली आहे.हिंदू धर्मीय रामभक्त , हा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पाहण्यासाठी , देशातीलच नव्हे तर परदेशातुनही श्री प्रभू रामचंद्राचे भक्त गणांचे लोंढेच्या लोंढे अयोध्येकडे आले होते. 

विविध मार्गाने ,विविध वाहनाने ,कुणी विमान तर कुणी जहाज ,कुणी कार, मोटारसायकलने,मात्र पुण्यामधून श्री रामाचा प्राणप्रतिस्थापण सोहळा पाहण्यासाठी व प्रभू रामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी दहा नवयुवकांनी श्री.प्रसाद यांचे नेतृत्वाखाली चक्क सायकल रॅली काढून प्रवास करीत आयोध्येला पोहोचले , पुणे ते आयोध्या हा सतराशे किलोमीटरचा प्रवास तेरा दिवसांमध्ये त्यांनी पूर्ण केला आहे. पाच जानेवारीला पुण्यातून सायकलवर प्रवासाला सुरुवात करुन तेरा दिवसात १७०० कि.मी.च्या प्रवासानंतर १७ जानेवारी २०२४ रोजी हे रामभक्त आयोध्येमध्ये पोहोचले .

सायकल प्रवास करून दर्शन घेणाऱ्यांमध्ये कॉल. एस व्ही एस ए प्रसादजी ,अनिकेत डहाळे गिरीश परदेशी, कैलास चव्हाण ,राजू औटी , संग्राम वरपे पाटील ,शंकर केंगर ,शिवाजी सलगर , विलास तुकाराम कोळी यांचा समावेश होता.आयोध्येमध्ये पोहचल्यानंतर रामलल्लाच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठापना होण्याअगोदरच त्यांनी रामलल्ला चे दर्शन घेऊन आनंदी झाले आहेत. डोळ्याचे पारणे फेडणारी,या सोहळ्याची तयारी पाहून हे रामभक्त भारावून गेले  होते.

प्रभू रामचंद्र देवाचे दर्शन घेतल्यानंतर या भक्तांनी देवाकडे सर्वांचे कल्याण होवो ,सर्वांना सुखी ठेवा, सर्वत्र शांती लाभो अशा भावना व्यक्त केल्या आहेत .आयोध्या वरून हा भव्य दिव्य सोहळा पाहून परत पुण्यात आल्यानंतर त्यांनी आपला सायकल प्रवासावरील अनुभव , आयोध्येमधील दर्शन सोहळ्याचे वर्णन सांगण्यासाठी व श्री राम लल्लाचा प्रसाद सर्व भक्तांना देण्यासाठी २६ जानेवारी २०२४ रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे दीपक भराडिया यांनी सांगितले आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

श्रमण संघीय साधु साध्वियों की चातुर्मास सूची वर्ष 2024

पर्युषण महापर्व के प्रथम पांच कर्तव्य।

तपोवन विद्यालय की हिमांशी दुग्गर प्रथम