डोंगरी चर्च मध्ये मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू ऑपरेशन शिवीर गुरुवारी

मधुमेहाची तपासणी करण्यात येणार


भाईंदर-
सामाजिक सांस्कृतिक संस्था युथ सोशल वेलफेअर असोसिएशन (युथ फोरम),
 ब्लेस्ड फॉर एवर, शताब्दी गौरव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात डोळ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मोफत मोतीबिंदूचे ऑपरेशन ही केले जाणार आहे. त्याचबरोबर गॅलेक्सी हॉस्पिटलकडून मधुमेहाची तपासणी करण्यात येणार आहे.

हे शिबिर गुरुवार,२४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत सेंट बेथलेम चर्च,डोंगरी गांव,भायंदर (वेस्ट) येथे होणार असल्याची माहिती फोरमचे सरचिटणीस अतुल गोयल व शेरॉन सलढाना यांनी दिली. शिबिरात भक्तिवेदांत हॉस्पिटलतर्फे मोतियाबिंद ची शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत.शिबिराचे वैशिष्टे : मोतीबिंदू शस्त्रक्रिया भक्तिवेदांत रुग्णालयात केली जाईल. इच्छुकांना अल्प दरात उच्च दर्जाची लेन्स बसविण्यात येईल.भक्तीवेदांत रुग्णालयातील वास्तव्याच्या काळात मोफत चहा, नाश्ता, व जेवणाची व्यवस्था केली जाईल.प्रत्येक रुग्णाने आधार कार्ड व फोन नंबर घेऊन येणे आवश्यक आहे.

सवलतीच्या दरात चष्मा उपलब्ध करून देण्यात येतिल. लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन फोरमचे अध्यक्ष दीपक आर जैन व जनसंपर्क अधिकारी विष्णु पारिक यांनी केले आहे.लायन्स क्लब ऑफ मुंबई महानगर , लायन्स क्लब ऑफ मुंबई,सूरजप्रकाश,हे विशेष भागीदार आहेत.


टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

श्रमण संघीय साधु साध्वियों की चातुर्मास सूची वर्ष 2024

तपोवन विद्यालय की हिमांशी दुग्गर प्रथम

पर्युषण महापर्व के प्रथम पांच कर्तव्य।