सफाई तीथे करा जिथे कचरा आहे

गीता जैन यांचे आव्हान 
भाईंदर -मीरा -भाईंदर च्या माजी महापौर व नगरसेविका गीता जैन यांनी स्थापण केलेली सामाजिक संस्था अस्त्र फाउंडेशन तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुरू केलेल्या स्वच्छता ही सेवा 'च्या अनुसंगाने भाईंदर जवळ असलेल्या उत्तन परिसरातील समुद्र किनाऱ्यावर पहिल्यांदाच स्वच्छता मोहिम राबवण्यात आली असून याला स्थानिक संस्था व नागरिकाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम कार्यक्रम महात्मा गांधी यांच्या 150 व्या जन्म जयंती निमित्त आयोजित करण्यात आले होते.सकाळी 8 वाजल्यापासून शुरू झालेला हा कार्यक्रम संध्याकाळ पर्यंत शुरू होता.
गीता जैन यांनी सांगितले की उत्तन गांव समुद्र किनारे व वैलंकनी चर्च हे  पर्यटकांचे आकर्षनाचे केंद्र आहेत पण गेल्या काही वेळापासून सफाई कड़े दुर्लक्ष केले ज़ात आहे त्यामुळे पर्यावणाचे नुकसान होत आहे म्हणून ही मोहीम शुरू केली आहे जी पुढे पण चालू राहणार आहे. जैन यांनी लोकांना आवाहन केले आहे की सफाई तीथे करा जीथे कचरा आहे. यावरून असे दिसते की गीता जैन यांचा आ. नरेंद्र मेहता यांच्याकडे तर हा निशाणा नाही ना ?  त्यांनी मधे लावलेल्या बैनर 'धर्म स्थापनार्थ व 'माझे धेय परिवर्तनाचे सामर्थ्य याची अजूनही शहरात चर्चा शुरू आहे. साफ सफाई असलेल्या जागांवर सफाई करून काहीही साध्य होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी शुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेला तेव्हाच यश मिळेल जेव्हा आपण ठिकठिकाणी असलेला कचरा साफ करण्यात यशस्वी होवू. सदर कार्यक्रमात फादर सायमन,दरिया माता चर्च मधील स्नेह ज्योत सोशल सेंटर,अभिनव विद्द्या मंदिर तसेच के एच. मेहता स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून  मोट्या प्रमाणात सहकार्य  मिळाले. उत्तनच्या समुद्र किनाऱ्यावरून  8 ते 10 गाड्या  डंपर कचरा काढण्यात आला.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

श्रमण संघीय साधु साध्वियों की चातुर्मास सूची वर्ष 2024

पर्युषण महापर्व के प्रथम पांच कर्तव्य।

तपोवन विद्यालय की हिमांशी दुग्गर प्रथम