मिरा भाईंदर महानगरपालिका मालमत्ता कर विभागामार्फत सन ₹182 कोटीची विक्रमी वसूली

सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेहेनतमुळे हे यश प्राप्त - आयुक्त

पाणीपट्टी कर वसुलीने गाठले 95.40 टक्के उद्दीष्ट, जाहिरात कर, बाजार कर वसुली करण्यासाठी महापालिकेला यश प्राप्त


भाईंदर :-
मालमत्ता कर वसुलीचा वेग हा आणखी जास्त प्रमाणात वाढवण्यात यावा यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सततच्या मालमत्ता कर विभाग आढावा बैठकीनुसार शहरातील मालमत्ता कराचा सतत पाठपुरावा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मिरा भाईंदर शहरामधील बऱ्याचश्या मालमत्ता धारकांकडे वर्षानुवर्षे थकबाकी असल्याने अश्या वर्षानुवर्षे थकित असलेल्या मालमत्तांच्या बाबतीत महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार सदर मालमत्ता जप्त करण्यात याव्यात व त्यावर महानगरपालिकेचे नाव चढवून अश्या मालमत्ता जाहीर लिलावद्वारे विक्री करण्याचे निर्देश देण्यात आले होते. याबाबत सतत शहरातील नागरिकांमध्ये विशेष जनजागृती देखील करण्यात आली होती. सदर कारवाईस सुरुवात होताच व जनजागृती केल्या कारणाने शहरातील मालमत्ता धारकांनी कर भरणा करण्यास सुरुवात केली.

सदर कारवाईचे परिणाम म्हणून दिनांक 31 मार्च 2023 रोजी मध्यरात्रीपर्यंत मिरा भाईंदर महानगरपालिका मालमत्ता कर विभागामार्फत ₹182 कोटीची विक्रमी कर वसुली करण्यात आली आहे. ₹182 कोटी मालमत्ता कर वसुली करण्याचे श्रेय आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (कर विभाग) संजय शिंदे, नियंत्रण अधिकारी, सहाय्यक नियंत्रण अधिकारी, मालमत्ता कर विभागप्रमुख, सर्व कर निरीक्षक, कर वसुली लिपिक व कर्मचारी यांना दिले आहे. त्याचबरोबर निर्देशानुसार कर वसुली करण्यासाठी नेमण्यात आलेल्या नियंत्रण अधिकारी व सहाय्यक नियंत्रण अधिकारी यांचे आयुक्त यांनी विशेष कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. विशेष बाब म्हणजे आयुक्त यांच्या निर्देशानुसार महापालिका अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त यांनी कर वसुली उद्दीष्ट गाठण्यासाठी प्रत्यक्ष घरोघरी व मोठे थकबाकीदारांना भेट देऊन कर वसुली केली. मागील वर्षी दिनांक 31 मार्च 2022 रोजी ₹150 कोटी इतकी कर वसुली करण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाची मालमत्ता कर वसुली ही उत्कृष्टरित्या व वेगाने झाली आहे. मा. आयुक्त यांच्या निर्देशानुसार, उपायुक्त (माहिती तंत्रज्ञान) यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती व तंत्रज्ञान अधिकारी राज घरत यांच्या विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या 

www.mbmc.gov.in वेबसाईट व MyMBMC मोबाईल ॲपचा वापर करून मालमत्ता कर भरणा करण्यासाठी नागरिकांना आव्हान करण्यात आले होते. सदर आव्हानाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ऑनलाईन पद्धतीवर विशेष भर देत 1 लाख 25 हजार 697 नागरिकांनी एकूण 66 कोटी 27 लाख 03 हजार 419 इतका कर भरणा केला आहे. तर रोख रक्कमद्वारे 92 हजार 898 नागरिकांनी कर भरणा करून 37 कोटी 68 लाख 37 हजार 465 व धनादेशद्वारे (चेक) 91 हजार 560 नागरिकांनी कर भरणा करून एकूण 75 कोटी 21 लाख 27 हजार 625 इतका मालमत्ता कर भरणा केलेला आहे. मिरा भाईंदर महानगरपालिका कोषाग्रहामध्ये एकूण मालमत्ता कर 181 कोटी 52 लाख 92 हजार 260 इतका जमा करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर एकूण 5 कोटी 12 लाख 33 हजार 847 इतक्या रकमेच्या मालमत्ता महापालिका मालमत्ता कर विभागामार्फत जप्त करण्यात आलेल्या असून त्याचा भरणा न केल्यास लवकरच त्या मालमत्ता जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर अतिरिक्त शहर अभियंता सुरेश वाकोडे, कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा विभाग) शरद नानेगावकर यांच्या प्रयत्नाने व पाणीपुरवठा विभागामार्फत सुद्धा पाणीपट्टी कर 83 कोटी 57 लाख 66 हजार 831 इतकी वसुली करून 95.40 टक्के इतके उद्दीष्ट गाठण्यात आले आहे. तसेच जाहिरात कर 5 कोटी 25 लाख 34 हजार 616 इतका वसूल करण्यात आला असून 87 टक्के कर वसुली करण्यात आली. बाजार कर 9 कोटी 67 लाख 61 हजार 961 इतका वसूल करून 99.26 टक्के कर वसुली करण्यात आली आहे.

आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली मिरा भाईंदर महापालिकेच्या स्थापनेपासून आज पर्यंतची सर्वात जास्त मालमत्ता कराची विक्रमी वसुली ₹182 कोटी इतकी करण्यात आली. सर्व अधिकारी/कर्मचारी यांचे कर वसुलीसाठी केलेल्या प्रयत्नाचे हे फळ असल्याचे आयुक्त यांनी सांगितले व सर्वांचे अभिनंदन आयुक्त यांनी केले. खासदार,  आमदार, माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी सदस्य पत्रकार बंधू यांच्या सहकार्याने व शहरातील सर्व नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा करून केलेल्या सहकार्याबद्दल महापालिकेच्या व आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

श्रमण संघीय साधु साध्वियों की चातुर्मास सूची वर्ष 2024

तपोवन विद्यालय की हिमांशी दुग्गर प्रथम

पर्युषण महापर्व के प्रथम पांच कर्तव्य।