ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक शुक्रवारी आरोग्य तपासणी
युथ फोरम आणि ब्लेस्ड फॉर एवर चा कार्यक्रम भाईंदर: - ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना निरोगी ठेवण्यासाठी मोबाइल हेल्थ केअर युनिटचे काम सुरू झाले ही खूपच चांगली बाब आहे. उपरोक्त मत पद्मश्री ब्रह्मदेव पंडित यांनी सामाजिक सांस्कृतिक संस्था युथ सोशियल वेलफेयर एसोसिएशन (युथ फोरम),ब्लेस्ड फॉर एवर, वीफॉरयू इत्यादी संस्थांनी सुरू केलेल्या शिबिराचे उद्घाटन करताना दिले. प्रमुख पाहुणे रमेश बंबोरी होते. विशेष पाहुणे भायंदर मेडिकल होलसेल एसोसिएशन चे चिटनीस भवानीशंकर गाडोदिया होते.भाईंदर (पश्चिम) येथे सकाळी ९. ३० ते संध्याकाळी पांच पर्यंत मध्ये शिव ब्रह्म मंदिर (9.30 to 10.30am),भाईंदर पोलिस स्टेशन (10.45 to 11.45am), जैन मंदिर रोड (12.00 to 1pm), मोदी पटेल रोड (1.30pm), जय अंबे नगर (2.45pm),विरुंगळा केंद्र (3.30 to 5.00pm) अश्या सहा ठिकाणी हेलपेज इंडियाच्या मोबाइल हेल्थ केयर युनिट कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती फोरमचे उपाध्यक...